ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. धैर्यशील पाटील यांचे निधन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १४ - ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. धैर्यशील पाटील यांचे आज दि. १४ रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. माजी नगराध्यक्ष निशांत पाटील यांचे ते वडील होतं. त्यांचे राजमाता छ. कल्पनाराजे, खासदार छ. उदयनराजे यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. ते सातारा म्युन्सिपल कामगार युनियनचे अध्यक्ष होते. कामगारांच्या हितासाठी त्यांनी चळवळ वाढवली होती. फौजदारी वकिलीत निष्णांत अशी त्यांची ओळख होती.
प्रख्यात कायदेपंडित म्हणून अॅड. डी. व्ही उर्फ धैर्यशील पाटील यांची ओळख आहे. त्यांनी अनेक फौजदारी गुन्ह्यात प्रभावीपणे बाजू मांडून निकाल खेचून आणणारच अशी त्यांची ओळख होती. बार कौन्सील ऑफ इंडियाचे अध्यक्षपद तसेच महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.
No comments