सोनवडी बु. येथे सापडला अर्भकाचा अर्धवट जळालेला मृतदेह
घटनास्थळी पाहणी करताना पोलिस अधिकारी |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ -: फलटण-शिंगणापूर मार्गावर सोनवडी बु. ता. फलटण येथे एका वगळीत नवजात अर्भकाचा अर्धवट जळालेला मृतदेह मिळाला असून या घटनेने या परीसरात खळबळ माजली आहे.
अर्धवट जळालेला मृतदेह |
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, सोनवडी बु. येथील शेतकरी देवा मोरे हे शेताकडे चालले असताना आज सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांना लळईच्या वगळेत हा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. मोरे यांनी संबंधित प्रकाराची माहिती गावचे पोलिस पाटील अनील सूर्यवंशी यांना दिली. त्यांनी या प्रकाराची माहीती फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात देताच पोलिस तातडीने घटनास्थळी हजर झाले. तेथे पाहणी केली असता वगळीलगत असलेल्या मोकळ्या जागेत बाभळीच्या तोडलेल्या वाळक्या काटक्या टाकून एका पुरुष जातीच्या नवजात अर्भकाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. सदर मृतदेह आज्ञाताने जाळला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. काल रात्री पडलेल्या पावसामुळे हा मृतदेह अर्धवट स्थितीत जळाला आहे. घटनास्थळास पोलिस उपअधिक्षक तानाजी बरडे यांनी पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे यांच्या समवेत भेट देत तेथील परिस्थितीची पाहणी केली. सदर मृतदेह ताब्यात घेवुन तो शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी पुढिल तपास पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे हे करीत आहेत.
No comments