सोनवडी बु. येथे एक जण वाहुन गेला
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८: फलटण-शिंगणापूर मार्गावरील सोनवडी बु. ता. फलटण येथे पाण्याचा अंदाज न आल्याने एक जण वाहुन गेला आहे. विजू चव्हाण वय ३६ रा. कोळकी ता. फलटण असे वाहून गेलेल्याचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, सोनवडी बु. येथील ओढ्याच्या पात्रात उतरलेल्या विजू चव्हाण यास तेथील पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला आहे. आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. चव्हाण हा मुळचा कर्नाटकातील असून कामानिमित्त तो इकडे आल्याची माहिती मिळत आहे. काल रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यातील पाण्याची पातळी वाढली असून पाणी वेगाने वाहत आहे. आज सुट्टी असल्याने चव्हाण या ठिकाणी आला होता.
Post Comment
No comments