सांगवी अंगणवाडीतून एलईडी टिव्हीची चोरी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १३ : सांगवी ता. फलटण येथील भिमनगरमधील अंगणवाडीतून दहा हजार रुपये किंमतीचा बत्तीस इंची एलईडी टिव्ही आज्ञाताने चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातुन मिळालेली माहिती अशी की, तीन सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजल्या नंतर व पाच सप्टेंबर २०२२ रोजीच्या सकाळी दहा वाजता या कालावधीत सांगवीगावातील भिमनगर येथील अंगणवाडीतुन भिंतीवर लावलेला दहा हजार रुपये किंमतीचा बत्तीस इंची एलईडी टिव्ही आज्ञात व्यक्तीने चोरुन नेला आहे. याबाबतची फिर्याद अंगणवाडी सेवीका मंगल कृष्णा राऊत रा. माळेवाडी सांगवी ता. फलटण यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक फौजदार शिंदे करीत आहेत.
No comments