Breaking News

मतदार ओळख पत्र आधारशी लिंक करण्यासाठी आज शिबीर

Today camp to link voter ID card with Aadhaar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १० - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघातील सर्व ३४० मतदान केंद्रावर रविवार दि. ११ सप्टेंबर २०२२ रोजी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येत असून  संबंधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत उपस्थित राहणार आहेत. तरी आपण आपले आधार क्रमांक अथवा इतर ११ कागद पत्रापैकी कोणतेही एक कागदपत्र घेवून संबंधीत ठिकाणी आपले मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणिकरण करुन घ्यावे असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी २५५ फलटण (अ. जा.) विधानसभा मतदार संघ तथा तहसीलदार फलटण समीर यादव यांनी केले आहे.  

    भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे निर्देशानुसार मतदार यादी प्रमाणिकरण करण्यासाठी मतदारांचे आधार क्रमांक मतदार ओळख पत्राशी जोडण्याचे काम सध्या फलटण शहर व तालुक्यात सुरु असून मतदार बंधू - भगिनींनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन  तहसीलदार समीर यादव यांनी केले आहे.

      सदर विशेष शिबीराचा जास्तीत जास्त मतदारांनी लाभ घ्यावा व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना सहकार्य करावे असे सांगतानाच ज्यांच्याकडे आधार क्रमांक नाही अशा मतदारांनी १) मनरेगा जॉब कार्ड, २) बँक/पोस्टाचे फोटो असलेले खाते पुस्तक, ३) श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ४) वाहन चालक परवाना, ५) पॅन कार्ड, ६) आरजीआय ने एनपीआर अंतर्गत जारी केलेले स्मार्ट कार्ड, ७) भारतीय पारपत्र (पासपोर्ट), ८) फोटो सहित पेंशन कागदपत्र, ९) केंद्र/राज्य सरकारने/पीएसयू/पब्लिक लिमिटेड कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेले फोटो सहित सेवा ओळखपत्र, १०) संसद सदस्य/ विधानसभा सदस्य/विधान परिषद सदस्य यांना जारी केलेले ओळखपत्र, ११) भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने जारी केलेले विशेष ओळखपत्र यापैकी एका कागद पत्राद्वारे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचेमार्फत किंवा मतदार स्वतः nvsp.in, Voters Portal किंवा Voter Helpline या ॶॅप मार्फत आपले मतदार यादीतील नावाचे प्रमाणिकरण करु शकतात, ते प्रत्येकाने करुन घ्यावे असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी २५५ फलटण (अ. जा.) विधानसभा मतदार संघ तथा तहसीलदार फलटण समीर यादव यांनी केले आहे.

No comments