Breaking News

सगुनामाता नगर येथे जलमय परिस्थिती ; मात्र मुख्याधिकारी फोन उचलत नाहीत

Water situation in Sagunamata Nagar

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.११ - मुसळधार पावसामुळे सर्वत्र जळमाय परिस्थिती  निर्माण होवून, जनजिवन विस्कळीत झाले आहे.    मलठण येथील रस्ते पूर्ण जलमय झाले आहेत. फलटण नगरपरिषदेने केलेल्या बंदिस्त गटाराला या परिसरात चेंबर  नसल्यामुळे पाणी बाहेर येत आहे, त्यातच चेंबरसाठी नागरपालिकेकडून खड्डे खोदून ठेवल्यामुळे पाणी पुढे जात नाही, परिणामतः  मलठणच्या साई मंदिर, सगुनामाता नगर परिसरात पाणी साचून राहत आहे. नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरत असून, रस्ते देखील जलमय झाले आहेत, मुख्याधिकारी यांच्याकडे  तक्रार करण्यासाठी फोन केला तर मुख्याधिकारी फोन देखील उचलत नाहीत, वास्तविक प्रशासक म्हणून आज त्यांची जबाबदारी आहे, परंतु प्रशासक फोन उचलत नसतील तर आम्ही कोणाकडे तक्रार करायची असा सवाल भाजपाचे माजी शहराध्यक्ष उदय मांढरे यांनी केला.
सगुनामाता नगर परिसरात जलमय झालेले रस्ते
   फलटण शहरात व मलठणमध्ये अनेक ठिकाणी गटारे तुडूंब भरल्याने व तुंबल्याने पाणी रस्त्यावरुन वाहिल्याने त्याचा फटका येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना बसला. पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने किरकोळ अपघातही घडले.  काही ठिकाणी घरात पाणी घुसण्याच्या घटनाही घडल्या आहेत. फलटण नगरपरिषदेने केलेल्या बंदिस्त गटाराला या परिसरात चेंबर  नसल्यामुळे पाणी बाहेर येत आहे, त्याची तक्रार नगरपालिकेकडे केल्यानंतर, चेंबर बांधण्यासाठी नगरपालिकेने, मलठणच्या साई मंदिर, सगुनामाता नगर परिसरात खड्डे खोदून ठेवले, त्यामुळे आता पाणी पुढे जात नाही परिणामतः या परिसरात पाणी साचून राहिले आहे व घरामध्ये व रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे, ही परिस्थिती निर्माण करायला नगर पालिकाच जबाबदार आहे,  खरे तर अश्यावेळी नगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन समिती तयार करून २४ तास कार्यारत ठेवायला हवी. अशीच परिस्थिती राहिली तर मग् महात्मा फुले चौकातून गजानन चौकात येणारे पावसाचे पाणी मुख्याधिकारी यांच्या घरासमोर अडवून, तेच पाणी त्यांच्या घरात सोडावे लागेल असा इशारा उदय मांढरे यांनी दिला आहे.

No comments