Breaking News

गुणवरे येथे महिलेचा विनयभंग ; एकावर गुन्हा

Woman molested at Gunavare; A crime against one

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ सप्टेंबर मौजे गुणवरे ता. फलटण गावच्या हद्दीत,  पीडित महिलेसमोर लघुशंका करण्यासाठी उभा राहून, पीडित महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने, पीडित महिलेने संबंधिताची तक्रार आपल्या पतीकडे केली, पतीने संबंधिताकडे त्याचा जाब विचारला असता, त्याने शिवीगाळ करत पीडित महिलेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुणवरे येथील लिंकन आढाव यांच्या विरोधात विनयभंग व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १२.०० ते १२.३० वाजण्याच्या दरम्यान मौजे गुणवरे ता. फलटण गावच्या हद्दीत श्री दत्त किराणा दुकानाचे समोर, लिंकन भागुजी आढाव रा. गुणवरे हा पीडित महिले समोर लघवीला उभा राहिला, त्यामुळे पीडित महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न झाली, या प्रकाराबाबत पीडितेने पती भारत आढाव यांना सांगितले असता,  पती लिंकन आढाव यास जाब विचारण्यास गेले असता, त्याने पीडितेच्या पती यांना दारू पिऊन  शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस पेंदाम या करीत आहेत.

No comments