ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई ; ५९ केसेस दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १६ नोव्हेंबर : फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत साखरवाडी पोलिस दूरक्षेत्राचे माध्यमातून आज ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोठ्या आवाजात गाणी वाजविणे, वाहनांना रिफ्लेक्टर न बसविणे आणि वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने रस्त्यावर वाहने लावल्या प्रकरणी एकूण ५९ केसेस करुन ४६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक धनंजय गोडसे यांनी दिली आहे.
मंगळवार दि. १५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, उप विभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम १०४/१७७ अन्वये ४० केसेस करण्यात आल्या, त्यांच्याकडून ४० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, वाहनांमध्ये गाणी वाजविणे १२ केसेस करण्यात आल्या त्यामध्ये ६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला तर वाहतुकीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने वाहन लावल्या प्रकरणी भादवी २८३ प्रमाणे ७ केसेस करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक धनंजय गोडसे यांनी सांगितले.
सदर कारवाई मध्ये पोलिस निरीक्षक धनंजय गोडसे यांच्या समवेत सपोनि सुशीलकुमार भोसले, पोलिस हवालदार हांगे, पोलिस शिपाई पठाडे, नलवडे सहभागी झाले होते.
No comments