Breaking News

कोळकी व जाधववाडी येथे बँक एटीएम फोडण्याचा प्रयत्न

Attempt to break bank ATMs at Kolki and Jadhavwadi

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ४ नोव्हेंबर - शहराच्या लगत असणाऱ्या कोळकी येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे ए.टी.एम. व जाधववाडी येथील आयडीबीआय बॅंकेचे ए.टी.एम. अज्ञात चोरट्यांकडून फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, मात्र या  दोन्ही घटनेत ए.टी.एम. मधील कॅश चोरीला गेली नसल्याचे दोन्ही बॅंकांनी फिर्यादीत म्हटले आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी, दिनांक २३/१०/२०२२  रोजी रात्रौ १.४७  वाजण्याच्या सुमारास आयडीबीआय बँक एटीएम जाधववाडी ता. फलटण  येथील एटीएम मशिन फोडण्याच्या प्रयत्न केला आहे. एटीएम मधील सीसीटीव्ही कॅमेरा खाली पाडून, त्याच्या वायरी तोडल्या आहेत. सीसीटीव्हीचा मेन कॅमेऱ्याचे तोंड वर केलेले आहे.  परंतू एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिनांक २३/१०/२०२२  रोजीचे रात्रौ १.४७ वाजण्याच्या सुमारास दोन इसम गॅस कटरने ए.टी.एम. फोडण्याचा प्रयत्न करीत असताना दिसले आहेत.  एटीएम मशीनमधील कॅश चेक केली असता, कॅश जशीच्या तशीच असल्याची फिर्याद गूगोलत चरण यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनला दिली आहे.

    दुसऱ्या घटनेत, दिनांक ३०/१०/२०२२  रोजी रात्रौ ०२.०२ ते ०२.०८ वाजनाच्या दरम्यान  अज्ञात चोरटयांनी, कोळकी ता. फलटण येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएममध्ये प्रवेश करून, एटीएममधील लॉबी कॅमेरा हलवून व त्यानंतर मोशन सेन्सर व एटीएममधील कॅमेऱ्यांची वायर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. एटीएम मशीनमधील कॅश जशीच्या तशीच असून,  सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार इसम यांनी बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएममध्ये प्रवेश करून एटीएममधील लॉबी कॅमेरा हलविताना दिसत असल्याची फिर्याद बँक ऑफ महाराष्ट्राच्या सुरज दिनकर साळुंखे यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनला दिली आहे.

No comments