श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठान आयोजित भजन स्पर्धा शुक्रवार दि. १८ रोजी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १७ नोव्हेंबर -: श्रीमंत लक्ष्मीदेवी नाईक निंबाळकर राणी साहेब यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठान आयोजित तालुकास्तरीय भजन स्पर्धा शुक्रवार दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, लक्ष्मीनगर फलटण येथे संपन्न होणार आहेत. या स्पर्धेमध्ये फलटण तालुक्यातील ३० भजनी मंडळी आतापर्यंत सहभागी झाली आहेत. नाव नोंदणी सुरु आहे.
श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून अशा प्रकारच्या भजन स्पर्धा प्रथमच आयोजित केल्या जाणार असून या माध्यमातून श्रीमंत लक्ष्मीदेवी राणीसाहेब यांनी त्यांचे कार्यकाळात फलटणमध्ये धार्मिक व आध्यात्मिक वातावरण वृद्धिंगत होण्यासाठी केलेल्या कार्याचे पुण्यस्मरण होणार आहे. या स्पर्धेबाबतच्या अधिक माहितीसाठी प्राचार्य विश्वासराव देशमुख यांचेशी ९२२६५६९६६२ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ११ हजार १११ रुपये, द्वितीय क्रमांकास ७ हजार ७७७ रुपये, तृतीय क्रमांकास ५ हजार ५५५ रुपये आणि उत्तेजनार्थ ३ हजार ३३३ रुपये रोख पारितोषिक देवून गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन आ. दिपकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार असून त्याच दिवशी सायंकाळी स्पर्धेचे बक्षीस वितरण नामजप संकुल प्रकल्पाचे अध्यक्ष ह.भ.प. धैर्यशील भाऊ देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. उद्घाटन व बक्षीस वितरण दोन्ही समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र विधान परिषद माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर स्वीकारणार आहेत.
फलटण व पंचक्रोशीतील भाविकांनी या भजन स्पर्धेस उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
No comments