निरगुडी येथे जुगार अड्ड्यावर छापा ; ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण गिरवी मार्गावरील निरगुडी गावच्या हद्दीतील पांचाळ वाडी येथे ग्रामीण पोलिसांनी जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत एकुण ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलमान्वये गुन्हा नोंद झाला आहे.
रोहीदास नंदू गोरे वय ४७ रा. निरगुडी ता. फलटण व जयकुमार पवार वय ६० रा. मलटण, फलटण अशी गुन्हा नोंद झालेल्या संशयीतांची नावे आहेत. याबाबत ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन वर नमूद ठिकाणी त्यांनी आज दुपारी पावनेएकच्या सुमारास धाड टाकुन घटनास्थळावरुन जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल व एक दुचाकी असा एकुण एकसष्ट हजार ६१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
No comments