दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
सातारा : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, विकलांग व्यक्ती सबलीकरण विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपूर्व शिष्यवृत्ती, शालांत परीक्षोत्तर (पोस्ट मॅट्रीक) शिष्यवृत्ती व उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती या योजना राबवण्यात येत आहेत.
या योजनेसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पोर्टल www.scholarship.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी पोर्टलवर अर्ज सादर करण्याची मुदत पुढीलप्रमाणे आहे.
शालांतपूर्व शिष्यवृत्तीसाठी दिनांक 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत नोंदणी करावी. दि. 30 नोव्हेंबर पर्यंत सदोष अर्जाची व संस्था पडताळणी करण्यात येईल. नोडल अधिकाऱ्यांची पडताळणी दि. 15 डिसेंबर 2022 पर्यंत करण्यात येईल. तर शालांत परीक्षोत्तर (पोस्ट मॅट्रिक) शिष्यवृत्ती व उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी दि. 30 नोव्हेबर 2022 रोजीपर्यंत नोंदणी करावी. सदोष अर्ज व संस्था पडताळणी 15 डिसेंबर 2022 रोजीपर्यंत होईल. तर नोडल अधिकाऱ्यांची पडताळणी 31 डिसेंबर 2022 रोजीपर्यंत होणार आहे.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर मान्यताप्राप्त शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, उच्च महाविद्यालयाचे विभाग प्रमुखांनी त्यांच्या संस्थांमधील सर्व प्रवेशित दिव्यांग विद्यार्थ्यांचे अर्ज मुदतीत भरून घ्यावेत असे आवाहन, डॉ. सपना घोळवे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांनी केले आहे.
No comments