Breaking News

वडले येथील घरातून १ लाख ८० रुपयांचा ऐवज लंपास ; संशयितांचे सिसिटीव्ही फुटेज

1 lakh 80 rupees from the house in Vadale; CCTV footage of the suspects

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ डिसेंबर  : फलटण शिंगणापूर रस्त्यावरील वडले ता. फलटण येथील एका घरातुन आज्ञात चोरट्याने एक लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. दरम्यान या चोरीतील संशयीतांचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले आहे. सदर फुटेजमध्ये एका मोटरसायकलवर दोन तरुण आढळून आले असुन त्यांनी तोंडाला रुमाल बांधले आहेत. कुणाला जर यासंदर्भात काही माहिती असेल तर त्यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात त्याची माहिती द्यावी असे आवाहन पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी केले आहे.

        याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, शनिवार दि. २४ डिसेंबर रोजी  गोपाळ देवबा सोनवलकर वय ५५ रा. वडले ता. फलटण हे त्यांच्या घराचा दरवाजा ढकलून  शेतात गेले होते तेव्हा दुपारी १२.३० ते सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरातून आज्ञात चोरट्यांनी ३० हजार रुपये रोख, सोन्याचे नेकलेस, सोन्याची चैन, सोन्याच्या अंगठ्या, लक्ष्मीहार असे सुमारे सहा तोळे वजनाचे दागिने असा १ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला आहे. तपास पोलिस हवालदार खाडे करीत आहेत.

No comments