Breaking News

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कंपाउंडवर कोयता मारल्या प्रकरणी २ जणांना अटक ; डीवायएसपींचे शांततेचे आवाहन

2 persons arrested in case of breaking the compound  

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ डिसेंबर - छत्रपती शिवाजी महाराज चौक फलटण येथे काही इसमांनी दारूच्या नशेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कंपाउंड  कट्ट्यापाशी ग्रीलवर कोयता मारल्या प्रकरणी दोन जणांना शहर पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, सदरचा प्रकार या आरोपींनी दारूच्या नशेत केला असून, घडल्या प्रकाराबाबत कोणतीही उलटसुलट चर्चा अथवा अफवा न पसरविता, सार्वजनिक शांततेच्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती. सदर आरोपीवर पोलीस कठोर कारवाई करत असून त्यांना उचित शासन करण्यात येईल. सामाजिक सलोखा राखण्याचा दृष्टीने प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी केले आहे.  

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर घडलेला प्रकार हा दिनांक १८/१२/२०२२  रोजी रात्रीच्या वेळी घडला होता.सदरची घटना करणारे ३ पैकी २ इसमाना ताब्यामध्ये घेण्यात आले आहे, एक अल्पवयीनचा शोध सुरू आहे. ताब्यातील इसमांकडे याबाबत चौकशी सुरू आहे. सदरचे इसमांवर भा.द.वि ३९४,३४१,३४  अन्वये गु.र.न.580/22,581/22,582/22 असे जबरी चोरीचे 3 गुन्हे काल दाखल करण्यात आले असून, त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे. 

No comments