Breaking News

४ ग्रामपंचायत बिनविरोध ; २० सरपंच पदांसाठी ७३ आणि २१० सदस्य पदांसाठी ४६८ उमेदवार रिंगणात

4 Gram Panchayats unopposed; 73 candidates for 20 Sarpanch posts and 468 candidates for 210 member posts
    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)   : फलटण तालुक्यात ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरु असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी २० ग्रामपंचायत मधील २० थेट सरपंच पदासाठी ७३ व २० ग्रामपंचायती मधील २१० सदस्य पदांसाठी ४६८ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले असून झडकबाईचीवाडी, वेळोशी, मानेवाडी आणि मिरेवाडी कुसुर या ४ ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध पार पडल्या असल्याचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी समीर मोहन यादव यांनी सांगितले.
     २० ग्रामपंचायत मधील सरपंच पदाच्या जागेसाठी एकूण ७३ आणि २१० सदस्य पदाच्या जागेसाठी एकूण ४६८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
         त्यामध्ये बरड  थेट सरपंच पदासाठी ७ आणि सदस्य पदाच्या १३ जागांसाठी  ३२, वडले सरपंच पदांसाठी २ आणि सदस्य पदाच्या ९ जागांसाठी १८, सोमंथळी सरपंच पदासाठी ३ आणि सदस्य पदाच्या ११ जागांसाठी २२, चौधरवाडी सरपंच पदासाठी ५ आणि सदस्य पदाच्या ११ जागांसाठी १७, कुरवली खु|| सरपंच पदासाठी ४ आणि सदस्य पदाच्या ७ जागांसाठी २०, ताथवडा सरपंच पदासाठी ४ आणि सदस्य पदाच्या ९ जागांसाठी १६, मठाचीवाडी सरपंच पदासाठी व सदस्य पदाच्या ११ जागांसाठी १८, गिरवी सरपंच पदासाठी ३ आणि सदस्य पदाच्या १३ जागांसाठी ३६, तरडफ सरपंच पदासाठी २ आणि सदस्य पदाच्या ९ जागांसाठी १९,  पिंप्रद सरपंच पदासाठी ४ आणि सदस्य पदाच्या ११ जागांसाठी २२, विडणी सरपंच पदासाठी ४ आणि सदस्य पदाच्या १७ जागांसाठी ३८, वाठार निंबाळकर सरपंच पदासाठी ४ आणि सदस्य पदाच्या ११ जागांसाठी २५, दुधेबावी सरपंच पदासाठी ३ आणि सदस्य पदाच्या ११ जागांसाठी २३, आदर्की बु||  सरपंच पदासाठी ६ आणि सदस्य पदाच्या ९ जागांसाठी २०, आदर्की खु|| सरपंच पदासाठी २ आणि सदस्य पदाच्या ९ जागांसाठी १८, सुरवडी सरपंच पदासाठी ४ आणि सदस्य पदाच्या ११ जागांसाठी २३, पाडेगाव सरपंच पदासाठी ४ आणि सदस्य पदाच्या १३ जागांसाठी २४, सालपे सरपंच पदासाठी २ आणि सदस्य पदाच्या ९ जागांसाठी १७, चव्हाणवाडी सरपंच पदासाठी २ आणि सदस्य पदाच्या ९ जागांसाठी १८, कुसुर सरपंच पदासाठी २ आणि सदस्य पदाच्या ७ जागांसाठी १४.
    फलटण तालुक्यातील २४ पैकी ४ ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध पार पडल्या असून उर्वरित २० ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीसाठी संबंधीत गावात सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे.
       मंगळवार दि. २० डिसेंबर रोजी शासकीय धान्य गोदाम, फलटण येथे सकाळी ११ वाजले पासून मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.

No comments