Breaking News

फलटण तालुक्यात थेट सरपंच पदासाठी ७३ आणि सदस्य पदांसाठी ४६८ उमेदवार

73 candidates for sarpanch post and 468 candidates for member posts in Phaltan taluka

  फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.७ : फलटण तालुक्यात २४ ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीसाठी थेट सरपंच पदासाठी १६९ आणि  सदस्य पदासाठी ७३६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. पैकी सरपंच ३ आणि सदस्य १२ उमेदवारी अर्ज अवैध ठरले. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी ९३ व सदस्य पदासाठी २५६ अर्ज माघारी घेतले गेले. आता २४ ग्रामपंचायतिच्या निवडणूकीत थेट सरपंच पदासाठी ७३ आणि  सदस्य पदासाठी ४६८ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावणार आहेत.

        २४ ग्रामपंचायत मधील २४ सरपंच पदाच्या जागेसाठी एकूण १६९ आणि २३८ सदस्य पदाच्या जागेसाठी एकूण ७३६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या सर्व दाखल उमेदवारी अर्जांची छाननी  दि.५ रोजी करण्यात आली, त्यामध्ये सालपे येथील सरपंच पदाच्या एका जागेसाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी ३ अवैध ठरले आहेत.

      सदस्य पदासाठी दाखल ७३६ उमेदवारी अर्जांपैकी बरड १, ताथवडा ३, पिंप्रद २, आदर्की खु २, सुरवडी २, पाडेगाव २ असे एकूण १२ उमेदवारी अर्ज अवैध ठरले असून उर्वरित ७२४ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.

      आज  बुधवार दि. ७ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी ९३ व सदस्य पदासाठी २५६ अर्ज माघारी घेतले गेले. आता २४ ग्रामपंचायतिच्या निवडणूकीत थेट सरपंच पदासाठी ७३ आणि  सदस्य पदासाठी ४६८ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.

  रविवार दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत संबंधीत ग्रामपंचायत मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार असून मंगळवार दि. २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता नवीन शासकीय धान्य गोदाम, फलटण येथे  सर्व २४ ग्रामपंचायत मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. शुक्रवार दि. २३ डिसेंबर रोजी निवडणूकांचा निकाल प्रसिद्ध करण्याचा अंतीम दिनांक आहे. 

No comments