Breaking News

रस्ते, पूल कामासाठी ७८ कोटी मंजूर ; उपळवे रस्त्याचे होणार रुंदीकरण - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

78 crore sanctioned for road, bridge work; Upalve road will be widened - MP Ranjitsinh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१८ - माढा लोकसभा मतदार संघातील रस्त्यांच्या रुंदीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण कामांसाठी सन २०२२ - २०२३ मधील सी.आर.आय. एफ. फंडातून ७८ कोटी रुपये मंजूर करुन घेण्यात खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यशस्वी झाले असून या भरीव निधीच्या उपलब्धतेमुळे संबंधीत तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे.

         फलटण तालुक्यात कुरवली - मांडवखडक - दालवडी - उपळवे - कुळकजाई रस्त्यापैकी फलटण बाजूकडून २६.४ कि. मी. अंतरातील रस्ता ३.७५ मीटर वरुन ५.५ मीटर रुंद करणे, या अंतरातील पूल रुंदीकरण व मजबुतीकरण कामासाठी २५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

   इंदापूर - अकलूज - सांगोला - जत - मेंडिगीरी - उमराणी ते राज्य रस्ता एस एच १२५ मधील कि. मी. २७ ते ३२.४०० अंतरातील आणि अकलूज बायपास कि. मी. ० ते ३ असे एकूण ८.४ कि. मी. रस्त्यासाठी १७ कोटी रुपये, ओ डी आर ९५ ललगुन - नेर रस्त्यावरील पुलाचे बांधकामासाठी ८ कोटी रुपये, वाणी चिंचोळे - भोसे - रेडे निंबोनी - येड्राव - मरवडे रोड एम.डी.आर ६९ कि. मी. ३३ ते ४०.६०० पर्यंतच्या रस्त्याची सुधारणा करणे ९ कोटी रुपये, एम.डी.आर ११७ ते तरंगफळ - झांजेवाडी - खुडूस - विझोरी - चौडेशवाडी -अकलूज - सवतगव्हाण - तांबवे - गणेश गव्हाण ते एस.एच. १४५ रस्ता एम.डी.आर.१७५ कि. मी. २३ ते २३.८०० व २७.७०० ते २८.५०० आणि ३२.८०० ते ३४ पर्यंत सुधारणा करणे ४ कोटी रुपये, वेळापूर तांदूळवाडी ते महीम एम.डी.आर २०८ कि. मी. ० ते ८ रस्ता सुधारणा करणे ५ कोटी रुपये, माणगंगा नदीवर लघु पुलाचे बांधकाम आणि एम.डी.आर.१० ते टाकेवाडी - पांगरी - वावरहिरे - रानंद - पळशी - पिंपरे ते एस.एच.१४१ रोड एम.डी.आर.४७ मधील कि. मी.३४.८०० मध्ये ८ कोटी रुपये, दहीवडी - गोंदवले बु|| - नरवणे - वडजल - विरळी - झरे रोड एम.डी.आर. ५० कि. मी.१३.१०० नरवणे गावाजवळ २ कोटी रुपये असे एकूण ७८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

No comments