Breaking News

फलटण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी ८२.४३ टक्के मतदान

82.43 percent voting for gram panchayat election in Phaltan taluka

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१८ - तालुक्यातील वीस ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी आज तालुक्यातील ८७ मतदान केंद्रांवर मतदान झाले. या निवडणूकीत सेहेचाळीस हजार ६०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असुन एकुण ८२.४३ टक्के मतदान झाले आहे. मतदानानंतर आता सगळ्यांना निकालाची उत्सुकता लागुन राहिली आहे.

      आज सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत पार पडलेल्या मतदान प्रक्रीयेत २४ हजार ७६७ पुरुष, २१ हजार ८३९  महिला तर १ तृतीय पंथी असे एकुण ४६ हजार ६०७  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 

         दरम्यान उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी वेळोशी, मानेवाडी, झडकबाईचीवाडी आणि मिरेवाडी (कु) ह्या चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

No comments