Breaking News

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

The administration is ready for the counting of votes for the Gram Panchayat elections
    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ डिसेंबर -  : आगामी जिल्हा परिषद/पंचायत समिती पंचवार्षिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभर ग्रामपंचायत निवडणूकांसाठी मतदान अत्यंत  उत्साहाने पण चुरशीने संपन्न झाले असून उद्या मतमोजणी आणि निकालानंतर हा उत्साह व चुरस आणखी वाढणार असल्याचे चित्र आहे.  
         फलटण तालुक्यात २४ ग्रामपंचायत निवडणूका थेट सरपंच निवड प्रक्रियेसह जाहीर झाल्या, त्यापैकी वेळोशी, मानेवाडी, झडकबाईचीवाडी आणि मिरेवाडी (कुसूर) या ४ बिनविरोध झाल्या आणि उर्वरित २० साठी रविवार दि. १८ रोजी सर्व २० गावात अत्यंत शांततेत पण चुरशीने मतदान प्रक्रिया पार पडली आहे. २९ हजार ६३४ पुरुष, २६ हजार ९०८ स्त्रिया आणि इतर १ असे एकूण ५६ हजार ५४३ मतदारांपैकी २४ हजार ७०२ पुरुष, २१ हजार ७०४ स्त्रिया इतर १ अशा एकूण ४६ हजार ४०७ म्हणजे ८२.०७ % मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
      मंगळवार दि. २० रोजी सकाळी १० पासून शासकीय धान्य गोदाम, फलटण येथे मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
     थेट सरपंच पद निवड असल्याने अनेक गावात चुरशीने प्रचार यंत्रणा उभी राहिली होती, या सर्व २० गावात प्रामुख्याने विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व माढा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोन्ही प्रतिस्पर्धी नेत्यांच्या गटात जोरदार लढती झाल्या असून काही ठिकाणी अपक्ष, अन्य राजकीय पक्ष, संघटना यांचाही समावेश होता. गिरवी, सुरवडी, बरड, वाठार निंबाळकर, दुधेबावी आणि विडणी या मोठ्या गावांसह अन्य गावातही सरपंच पद व सदस्य पदासाठी अनेकांनी आपली संपूर्ण ताकद लावल्याचे दिसून आले, मात्र मतदार राजाने कोणाच्या पारड्यात आपले मत टाकले व कोण होणार गावचा नवा कारभारी हे मंगळवारी मतमोजणी व निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
          दरम्यान तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणी साठी एकूण १४ टेबल लावण्यात येणार असून २० गावातील मतमोजणीसाठी ६ फेऱ्या पूर्ण आणि ७ व्या फेरीत तरडफ येथील मतमोजणी ३ टेबलवर करण्यात येणार असून प्रत्येक फेरीनंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
    दरम्यान *पहिल्या फेरीत* वडले आणि विडणी या २ गावातील मतमोजणी करण्यात येणार आहे. वडले येथे एकूण १९०५ मतदारांपैकी १५७५ म्हणजे ८२ % मतदान झाले आहे. तर विडणी येथे एकूण ८३८२ मतदाना पैकी ६६७६ म्हणजे ७६ % मतदान झाले आहे.
       दुसऱ्या फेरीत दुधेबावी आणि गिरवी या २ गावातील मतमोजणी करण्यात येणार आहे. दुधेबावी येथे एकूण ३५५६ मतदाना पैकी २७६३ म्हणजे ७७.६९ % मतदान झाले आहे. तर गिरवी येथे एकूण ४५३२    मतदाना पैकी ३५८५ म्हणजे ७९.१० % मतदान झाले आहे.
       तिसऱ्या फेरीत आदर्की बु||, आदर्की खु||, सालपे आणि पाडेगाव या ४  गावातील मतमोजणी करण्यात येणार आहे.  आदर्की बु|| येथे एकूण २५५५ मतदाना पैकी २०४३ म्हणजे ७९.९६ % मतदान झाले आहे. आदर्की खु|| येथे एकूण २१२६  मतदाना पैकी १७९९ म्हणजे ८४.६१ % मतदान झाले आहे. सालपे येथे एकूण १५५१७  मतदाना पैकी १२७९ म्हणजे ८४.३१%      मतदान झाले आहे. पाडेगाव येथे एकूण ३६९४ मतदाना पैकी २९६८ म्हणजे ८०.३४ % मतदान झाले आहे.
     *चौथ्या फेरीत* बरड, मठाचीवाडी, सुरवडी या ३  गावातील मतमोजणी करण्यात येणार आहे. बरड येथे एकूण ४००७ मतदाना पैकी ३३०८ म्हणजे ८२.५५ % मतदान झाले आहे. मठाचीवाडी येथे एकूण २९४४    मतदाना पैकी २५२५ म्हणजे ८५.७६ % मतदान झाले आहे. सुरवडी येथे एकूण २५१४ मतदाना पैकी २१४६ म्हणजे ८५.३६ % मतदान झाले आहे.
      पाचव्या फेरीत चव्हाणवाडी, कुसूर, सोमंथळी, पिंप्रद या ४  गावातील मतमोजणी करण्यात येणार आहे. चव्हाणवाडी येथे एकूण १४०८ मतदाना पैकी १२३४ म्हणजे ८७.६४ % मतदान झाले आहे. कुसुर येथे एकूण ९९२ मतदाना पैकी ९३२ म्हणजे ९३.२० % मतदान झाले आहे. सोमंथळी येथे एकूण ३१८६  मतदाना पैकी २७६८ म्हणजे ८५.९३ % मतदान झाले आहे. पिंप्रद येथे एकूण २८४६ मतदाना पैकी २४७४ म्हणजे ८६.९२ % मतदान झाले आहे.
      सहाव्या फेरीत चौधरवाडी, कुरवली, ताथवडा, वाठार निंबाळकर या ४  गावातील मतमोजणी करण्यात येणार आहे. चौधरवाडी येथे एकूण ३१५६ मतदाना पैकी २५०१ म्हणजे ७९.२४ % मतदान झाले आहे. कुरवली येथे एकूण १२७६ मतदाना पैकी १०१५ म्हणजे ७९.५४ % मतदान झाले आहे. ताथवडा येथे एकूण ११८५  मतदाना पैकी १०१४ म्हणजे ८५.५६ % मतदान झाले आहे. वाठार निंबाळकर येथे एकूण ३०७८ मतदाना पैकी २३६० म्हणजे ८५.५६ % मतदान झाले आहे.
     सातव्या फेरीत तरडफ येथील मतमोजणी करण्यात येणार आहे. तरडफ येथे एकूण १६८२ मतदाना पैकी १४७० म्हणजे ८७.३९ % मतदान झाले आहे.

No comments