Breaking News

श्री काळेश्वरी देवी मांढरदेव यात्रा कालावधीत पशुबळी व वाद्य वाजविण्यास बंदी

Animal sacrifice and playing of musical instruments are prohibited during Shri Kaleshwari Devi Mandhardeva Yatra

    सातारा :  मांढरदेव ता. वाई या ठिकाणी दि.4 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीत श्री काळेश्वरी देवीची वार्षिक यात्रा संपन्न होणार आहे. या कालावधीत पशुबळी देण्यास व वाद्य वाजविण्यास बंदी आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे.

    उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी यात्रेत पशुबळी देण्यास बंदी केली असून दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर यात्रा कालावधीत कोणत्याही ठिकाणी पशुबळी दिला जाणार नाही. यासाठी पोलीस दल व प्रशासन योग्य ती दक्षता घेत  आहे.

    ढोल व वाद्यांच्या आवाजामुळे शेजारी काही अनुचीत प्रकार घडला तरी काही एकू येत नसल्याने  मांढरदेवी येथील काळेश्वरी परिसरात महाद्वार ते मंदिर व परत महाद्वार पर्यंत कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजविण्यासही  मनाई करण्यात आलेली आहे, असेही पोलीस अधीक्षक श्री. शेख यांनी कळविले आहे.

No comments