Breaking News

हनुमंतवाडी येथे दगडाने मारहाण; दाम्पत्यावर गुन्हा

Beating at Hanumantwadi; A crime against a couple

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  दि. ९ : पाईपलाईनचा चेंबर दुरुस्ती करत असताना त्याच्या मालकीच्या कारणावरुन हनुमंतवाडी ता. फलटण येथील एकजणास दगडाने मारहाण करणाऱ्या पती - पत्नी विरुध्द फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

         संजय महादेव भोसले व सौ. शारदा संजय भोसले दोघेही रा. हनुमंतवाडी ता. फलटण अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, सहा डिसेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास राजेंद्र मोहन शिंदे वय ४५ रा. हनुमंतवाडी ता. फलटण हे आपल्या घराशेजारील पाईपलाईनच्या चेंबर जवळ चेंबर दुरुस्ती करीत होते. त्यावेळी संजय भोसले व शारदा भोसले हे तीथे आले व पाईपलाईनचा उपळा चेंबर माझा आहे, त्याला हाथ लावायचा नाही असे म्हणत राजेंद्र शिंदे यांना संजय भोसले याने दगडाने मारहाण केली. त्याचवेळी शिंदे यांची पत्नी भांडणे सोडविण्यास आली असता तीला शारदा भोसले हिने मारहाण करुन शिवीगाळ व दमदाटी केली. याबाबत पुढिल तपास पोलिस हवालदार अमोल कर्णे करीत आहेत.

No comments