खामगाव ग्रामपंचायत कार्यालयात गोंधळ व मारहाण ; सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल
Beating in Khamgaon Gram Panchayat Office; A crime against one
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ - मौजे खामगाव ता. फलटण गावचे ग्रामपंचायत कार्यालयात मिटिंग चालू असताना, रायफल परवाना पाहिजे असे म्हणून, ग्रामपंचायत कार्यालयात गोंधळ घालून, ग्रामपंचायत कर्मचारी यांना मारहाण, शिवीगाळ केल्या प्रकरणी खामगाव येथील अनिल जाधव यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेले माहितीनुसार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १.०० वाजण्याच्या सुमारास मौजे खामगाव ता. फलटण गावचे ग्रामपंचायत कार्यालयात मिटिंग चालू असताना, अनिल शिवाजी जाधव रा. खामगाव हे तेथे आले, व हनुमंत विष्णू चव्हाण हे सरकारी काम करीत असताना, त्यांच्या सरकारी कामात अडथळा करून, 'मला रायफल परवाना पाहिजे' असे म्हणून, लेखी अर्ज देऊन ग्रामपंचायत कार्यालयात गोंधळ केला. हनुमंत चव्हाण यांनी त्यांना समजावून सांगत असताना, ऐकून न घेता त्याने चव्हाण यांच्या गचोरीस धरून, त्यांच्या डाव्या कानावर जोराने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली असल्याची फिर्याद हनुमंत विष्णू चव्हाण यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धोंगडे करीत आहेत.
No comments