Breaking News

दुचाकींची समोरासमोर धडक ; दुचाकीवरून पडलेल्या वृद्धाचा ट्रॉलीच्या चाकाखाली मृत्यू

Bike accidents; An old man fell off a bike and died under the wheel of a trolley

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  : फलटण पुसेगाव रस्त्यावर वाठार निंबाळकर गावच्या हद्दीत दोन दुचाकींच्या  समोरासमोर झालेल्या अपघातात एका दुचाकीवरुन खाली पडलेल्या वृध्द इसमाच्या अंगावरुन ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. 

         महादेव कृष्णा राठोड वय ६० रा. मिरगाव ता. फलटण असे मयत इसमाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, राहुल कृष्णा अहिरेकर वय ४२ रा. चौधरवाडी ता. फलटण व महादेव कृष्णा राठोड वय ६० रा. मिरगाव ता. फलटण हे दोघे २१ नोव्हें रोजी सायं ६ वा फलटणहून सातारा बाजूकडे जात होते.  वाठार निंबाळकर ता. फलटण गावच्या हद्दीत समोरून चुकीच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात मोटरसायकलस्वराने त्यांना जोराची धडक दिली यात खाली पडून अहीरेकर हे जखमी झाले तर पाठीमागे बसलेले महादेव राठोड हे खाली पडले व त्यांच्या अंगावरून पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची फिर्याद पोलीस हवालदार तुकाराम सावंत यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. यावरुन अज्ञात दुचाकी चालक व ट्रॅक्टर चालक यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.  अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे करीत आहेत.

No comments