Breaking News

जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धेत चॅम्पियन्स कराटे अकॅडमीच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

Brilliant performance of Champions Karate Academy players in district level karate tournament

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - शाहू स्टेडियम सातारा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या शालेय जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धेत चॅम्पियन्स कराटे अकॅडमी, फलटणच्या  खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत यश संपादन केले. या स्पर्धेत सुवर्ण पदक संपादन केलेल्या सात खेळाडूंची शालेय विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

    यामध्ये १४ वर्षाखालील मुले व मुली गटात पुढील खेळाडूंनी यश मिळवले. अनुष्का कोठारी (सुवर्ण पदक), ध्रुवी मेहता (रजत पदक), वेदांत भोसले  (कांस्य पदक), आर्यन पाटोळे (कांस्य पदक),  निल गांधी (कांस्य पदक), अबीर घोष (कांस्य पदक)  याने मिळवले.

     १७ वर्षाखालील मुले व मुली गटात पुढील खेळाडूंनी यश मिळवले. अथर्व खरात - (सुवर्ण पदक), योगिराज भिंगारे - (सुवर्ण पदक), साहस पवार - (सुवर्ण पदक), श्रेय दोषी - (रजत पदक), मिताली सस्ते - (रजत पदक)

     १९ वर्षाखालील मुले व मुली गटात पुढील खेळाडूंनी यश मिळवले. जान्हवी निंबाळकर  (सुवर्ण पदक), स्मिता पवार - (सुवर्ण पदक), इरम शेख - (सुवर्ण पदक)

    या खेळाडूंना चॅम्पियन्स कराटे अकॅडमीचे संस्थापक तसेच मुख्य प्रशिक्षक संतोष मोहिते सर, मार्गदर्शक व क्रीडा शिक्षक सुरज ढेंबरे सर, कु.प्रिया शेडगे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे मा. सभापती  श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फ. ए. सोसायटीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, फ. ए. सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

    सातारा येथे झालेल्या स्पर्धेत पूर्ण जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला, स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्या हस्ते झाले. सूत्रसंचलन श्री. सुरज ढेंबरे यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल निकाळजे सर यांनी मानले. या स्पर्धेत मुख्य पंच म्हणून जय पवार यांनी काम पाहिले. 

No comments