Breaking News

कसबा पेठ, फलटण येथे घरफोडी ; २ लाख रुपयांचा ऐवज लंपास

Burglary at Kasba Peth, Phaltan; Jewelery worth Rs 2 lakh stolen

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ डिसेंबर -  कसबापेठ, खाटीक गल्ली,  फलटण येथील बंद घराचे कुलूप तोडून, घरात प्रवेश करून, अज्ञात चोरट्याने घरफोडी केली आहे. यामध्ये सुमारे २ लाख ३ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे. 

    याबाबत अधिक माहिती अशी कसबा पेठ, खाटीक गल्ली, फलटण येथील सतीश लक्ष्मण सरगर वय ६२ वर्षे  हे आपल्या राहत्या घरास कुलूप लावून,  कुटुंबीयांसह चाळीसगाव जि. जळगाव येथे कार्यक्रमासाठी गेले होते. याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दि. १३/१२/२०२२ ते १८/१२/२०२२ रोजी १०.३० वाजण्याच्या दरम्यान सरगर यांच्या घराचे कुलूप तोडुन, घरात प्रवेश करुन, सुमारे २ लाख ३ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. 

    चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये १) २५  हजार रुपये किंमतीचे एक तोळा वजनाचे सोन्याचे कानातील झुबे व वेल २) २०  हजार रुपये किंमतीच्या एक ग्रॅम वजनाच्या ८ सोन्याच्या अंगठ्या ३) ५  हजार रुपये किंमतीचे ४ ग्रॅम २६० मिली वजनाची सोन्याची चैन ४) २  हजार रुपये किंमतीच्या २ ग्रॅम ७५० मिली वजनाचे १ सोन्याचे ब्रेसलेट ५) २५  हजार रुपये किंमतीच्या एक तोळा वजनाची सोन्याची चैन  ६) ४  हजार रुपये किंमतीच्या ७ ग्रॅम ८४० मिली वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स ७) २ हजार रुपये किंमतीची चांदीची वेणी ८) १० हजार रुपये किंमतीचा चांदीचा मेखला ९) २० हजार रुपये किंमतीचे ६ जोड चांदीचे पैंजण १०) दीड हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या बांगड्या  ११) २ हजार रुपये किंमतीचे चांदीचे बाजूबंद  १२) २ हजार रुपये किंमतीचा चांदीचा गडू १३) रोख रक्कम रुपये ८५ हजार असे एकूण सुमारे २ लाख ३ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दाग दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. 

No comments