Breaking News

ऊसतोड मुकादमाने केली फसवणूक ; गुन्हा दाखल

Cheating of one without providing sugarcane cutting labour

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२९ डिसेंबर- ऊस तोडणी कामगार देतो असे सांगून,  ४ लाख ४० हजार  घेऊन, ऊसतोड कामगार न देता, शिंदेनगर ता. फलटण येथील एकाची फसवणूक केल्या प्रकरणी, राजू प्रताप भिल रा. खापरखेडा ता. शहादा जि. नंदुरबार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मौजे शिंदेनगर ता. फलटण येथे  सन २०२०-२१ या गळीत हंगामासाठी, राजू प्रताप भिल रा. खापरखेडा ता. शहादा यांनी स्वराज इंडिया ॲग्रो लिमिटेड उपळवे ता. फलटण येथे ऊस तोडणी कामगार देतो असे सांगून, बापूराव जगन्नाथ रणवरे रा. शिंदेनगर, ता.फलटण यांच्याकडून  एकूण ४ लाख ४० हजार रुपये घेऊन, रणवरे यांना कोणीही ऊस तोडणी कामगार न देता, रणवरे यांनी दिलेली रक्कम परत न देता, रणवरे यांची फसवणूक केली असल्याची फिर्याद, बापूराव जगन्नाथ रणवरे  यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार साबळे करीत आहेत.

No comments