Breaking News

फलटण शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम बेकायदेशीर - ॲड. नरसिंह निकम

Encroachment Removal Campaign Illegal in Phaltan City - Adv. Narasimha Nikam

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३० डिसेंबर - फलटण शहरात सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम कायदेशीर आहे याचा पुरावा मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी द्यावा अशी मागणी करतानाच, शहरात सुरू असणारी अतिक्रमण मोहीम ही बेकायदेशीर असल्याचे ॲड. नरसिंह निकम यांनी स्पष्ट केले. 

    फलटण नगरपालिकेने चालू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला कडाडून विरोध करण्यासाठी आज माळजाई मंदिर, फलटण येथे शहरातील व्यापारी बहुसंख्येने बैठकीसाठी उपस्थित होते. ही बैठक नरसिंह निकम  यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी नगरसेवक अशोकराव जाधव, काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अमीरभाई शेख, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष वसिमभाई मणेर, उपाध्यक्ष विशाल पोतेकर, शिवसेनेचे विराज खराडे, मनसेचे युवराज शिंदे, रवींद्र फडतरे, इतर मान्यवर व व्यापारी बहुसंख्येने उपस्थित होते.

     या बैठकीवेळी शहरातील व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या, अतिक्रमण मोहीम अन्यायकारक आहे, पूर्वकल्पना न देता  तोंडे बघून केलेली कारवाई  असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.

No comments