Breaking News

फलटण शहरात अतिक्रमण हटाव मोहीम

एस.टी. स्टँड परिसर येथे अतिक्रमण काढताना (छाया- विशाल मोहिते)
Encroachment removal campaign in Phaltan city

    फलटण(गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२९ डिसेंबर - फलटण नगर परिषदेच्या वतीने आज शहरांमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली असून शहरात अनेक ठिकाणी करण्यात आलेली अतिक्रमणे बुलडोजर च्या साह्या जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने एस.टी. स्टँड परिसर, रविवार पेठ, माळजाई मंदिर परिसर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,  उमाजी नाईक चौक परिसर, पंचायत समिती परिसर, शिंगणापूर रस्ता अशा अनेक ठिकाणची अतिक्रमणे काढण्यात आली. शहरात असणाऱ्या अतिक्रमणधारकांना अनेक वेळा नोटीस देऊनही अद्याप अतिक्रमण न काढल्यामुळे शेवटी नगरपालिका प्रशासनाने जेसीबी चे साह्याने रस्त्याला अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढली. 

    फलटण नगरपरिषद हद्दीतील आरक्षित जागा, पडीक जागा, गायरान जमीनी, शासकीय जमीनी, नगरपरिषद मालकीच्या जागेवर, रस्त्यावरील अतिक्रमणे यांचेवर कार्यवाही करणेकामी मा. उच्च न्यायालय आणि शासनाने आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने फलटण नगरपरिषद व तहसिल कार्यालय यांचे संयुक्त अतिक्रमण हटाओ मोहिम दिनांक २९/१२/२०२२ रोजी सकाळी ७.३० वा. सुरु करणेत आली. या मोहिमेत रस्त्यावरील व वाहतुकीस अडथळा निर्माण होणारी अतिक्रमणे, जाहिरात फलक, शासकीय जमीनीवरील अतिक्रमणे काढणेत आली आहेत. शहरातील बहुतांश नागरीकांनी अतिक्रमणे, जाहिरात फलक, पत्राशेड स्वतः हटवुन नगरपरिषदेस सहकार्य केले. यापुढे नागरीकांनी अशाच प्रकारे स्वतः अतिक्रमणे काढुन घेणेत यावी. असे अहवान मुख्याधिकारी यांनी केले. अतिक्रमण मोहिम शहरातील वाहतुकीस अडथळे आणणारी सर्व अतिक्रमणे काढणेत येई पर्यंत सुरु राहणार आहे. ज्या नागरीकांची अतिक्रमणे आहेत त्यांनी त्यांची अतिक्रमणे स्वत: काढुन घेणेचे आवाहन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी नागरीकांना केले.

शहराचे मोठया प्रमाणावर विद्रुपीकरण झाल्याने बऱ्याच नागरीकांच्या तक्रारी आल्याने तसेच स्वच्छ सर्व्हेक्षणांतर्गत शहर सौंदर्यीकरणांस प्राध्यान्य असल्याने, शहराचे विद्रुपीकरण थांबवण्याकरीता अतिक्रमण हटावो माहिम मोठया प्रमाणात राबविणेचा मानस मुख्याधिकारी गायकवाड यांनी व्यक्त केला. या मोहिमेमध्ये तहसीलदार समीर यादव,  आणि त्यांच्या कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी, फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, पंढरीनाथ साठे, नगरअभियंता फलटण नगरपरिषद,  रोहीत पाटील,  विनोद जाधव,  सुरेंद्र काळेबेरे तसेच सर्व विभाग प्रमुख व अधिनिस्त कर्मचारी नगरपरिषद यांनी मोहिमेत सहभाग घेतला, सर्व पत्रकारांनी चांगले सहकार्य केले, पोलिस निरिक्षक यांनी पोलिस बंदोबस्त पुरविला.

No comments