Breaking News

फायनान्स वसुली ; मारहाण करून पोकलेन मशीन नेले

Finance recovery;  Poklen machine taken away

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)   : फलटण पंढरपूर रस्त्यावरील पिंप्रद ता. फलटण येथील एका पेट्रोल पंपावरुन सुमारे विस लाख रुपये किंमतीचे पोकलेन मशीन फायनान्स कंपनीच्या लोकांनी मारहाण, शिवीगाळ करुन दमदाटी व जीवे मारण्याची धमकी देत ट्रॅक्टरमध्ये भरुन नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सात जणांविरुध्द फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

          सागर व धायगुडे ( पूर्ण नाव माहित नाही ) यांच्यासह अन्य पाच अनोळखी इसम यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, राजाराम रावसो जाचक वय ५२ रा. लासुर्णे ता. इंदापूर यांच्या मालकीचे वीस लाख रुपये किंमतीचे सॅने 210C9 HYEXCAVATOR  मशीन सिरीयल नंबर 18SEY02A41351 हे मशीन दि. १ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पिंप्रद ता. फलटण येथील पेट्रोल पंपावरुन बारामतीतील एका फायनान्स कंपनीतील वरील संशयीतांनी जाचक यांना शिवीगाळ व मारहाण करुन तसेच दमदाटी व जीवे मारण्याची धमकी देवून ट्रॅक्टर क्र. एमएच ०६ एक्यू ५८९३ मध्ये भरून कोणताही कायदेशीर अधिकार नसताना बेकायदेशीरपणे घेऊन गेले. याबाबत राजाराम जाचक यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार डी. डी. कदम करीत आहेत.

No comments