Breaking News

ऊसतोड कामगार पुरवतो म्हणून एकाची ४ लाख २० हजार रुपयांची फसवणूक

Fraud of Rs. 4 lakh 20 thousand for supplying sugarcane workers

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : ऊसतोड कामगार पुरवतो म्हणून एक जणाची ४ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील एका ऊसतोड ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.

      तात्या भाऊ पोपट मोहिते वय ५० रा. गरबड ता. मालेगाव जि. नाशिक असे ठेकेदाराचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, बापूराव जगन्नाथ रणवरे वय ४७ रा. शिंदेनगर ता. फलटण यांनी मे  २०२० ते ११ ऑक्टोंबर २०२२ पर्यंत तात्याभाऊ मोहिते याला ऊसतोड कामगार पुरवण्यासाठी वेळोवेळी पाच लाख ६० हजार रुपये दिले होते. परंतु त्याने अनेक कारणे सांगून मजूर पाठवले नाहीत. त्यामुळे रणवरे यांनी मोहितेकडे दिलेले पैसे परत देण्याची मागणी केली. तेव्हा तात्याभाऊ मोहिते यांनी त्यांना एक लाख ४० हजार रुपये परत दिले व चार लाख २० हजार रुपये रकमेचा चेक दिला, मात्र सदरचा चेक हा न वटल्याने रणवरे यांनी पुन्हा मोहिते यांच्याकडे पैशाची मागणी केली, तेव्हा मोहिते यांनी त्यांना दमदाटी करत पैसे देण्यास नकार दिला. यामुळे बापूराव रणवरे यांनी फसवणूक झाल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास सहायक फौजदार सूर्यवंशी करीत आहेत.

No comments