Breaking News

महाराष्ट्रात लोकायुक्त कायदा अस्तित्वात येणार - देवेंद्र फडणवीस

Lokayukta Act will come into force in Maharashtra - Devendra Fadnavis

    राज्यात लोकायुक्त कायदा अस्तित्वात येणार असून भ्रष्टाचार विरोेधी कायदा (अ‌ॅंटी करप्शन अ‌ॅक्ट) आता लोकायुक्त कायद्यात समाविष्ट होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश या स्तरावरील लोकायुक्त असतील. तसेच हायकोर्टाचे दोन जज लोकायुक्ताच्या समितीत असतील. लोकायुक्ताच्या कक्षेत मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळही येणार आहे असे स्पष्ट संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

    उद्याच्या अधिवेशनात लोकायुक्त बील मांडले जाणार असून लोकायुक्त समितीत पाच सदस्य आणि दोन जणांचे बेंच असेल असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

No comments