Breaking News

सम्मेद शिखरजी क्षेत्र पर्यटण क्षेत्र घोषित केल्याच्या निषेधार्थ फलटण येथे निषेध मोर्चा

फलटण येथे सकल जैन समाजाच्यावतीने काढण्यात आलेला निषेध मोर्चा
A marcha at Phaltan to protest against the declaration of Sammed Shikharji area as a tourist zone

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २१ डिसेंबर -   झारखंड राज्यातील जैन धर्मियांचे श्रध्दास्थान महा पर्वतराज श्री सम्मेद शिखरजी क्षेत्र राज्य सरकाने पर्यटण क्षेत्र घोषित केल्याच्या निषेधार्थ आज फलटण येथे शहर व तालुक्यातील सकल जैन समाजाच्यावतीने भव्य निषेध मोर्चा काढला व हा निर्णय मागे घ्यावा या मागणीचे निवेदन प्रांतअधिकारी शिवाजीराव जगताप यांना जैन समाजाच्यावतीने देण्यात आले. 

  जैन धर्मियांचे २४ तीर्थंकर भगवानांपैकी २० तीर्थंकर भगवान ज्या पवित्र भुमीत मोक्षाला गेले अशा झारखंड राज्यातील श्री सम्मेद शिखरजी क्षेत्र तेथील सरकारने पर्यटण क्षेत्र घोषित केल्याने देशभरातील जैन बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे, त्याचे पडसाद फलटण येथेही उमटले. फलटण येथे जैन समाजाच्यावतीने फलटण शहर व तालुका बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात येवून भव्य मोर्चा काढण्यात आला. मारवाड पेठेतील चंद्रप्रभु मंदिरापासुन या मोर्चास प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गावरुन सदर मोर्चा अधिकार गृहावर नेण्यात आला. तेथे प्रांत अधिकारी शिवाजीराव जगताप यांना जैन समाजाच्यावतीने निवेदन देण्यात आले. 

      मोर्चामध्ये शहर व तालुक्यातील सर्व सकल जैन मंदिर ट्रस्ट, संघटना, युवक व महिला व मुले, मुली मोठ्या संखेने सहभागी झाले होते. जैन समाजाच्यावतीने आज फलटण शहर व तालुका बंद ठेवण्याचे आवाहन सर्व व्यापारी बंधूंना करण्यात आले होते. सकाळी सर्व व्यापार्यांनी आपली दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला परंतु दुपार नंतर सर्व व्यवहार पुन्हा सुरळीत सुरु झाले.

No comments