अल्पसंख्यांक दिवस प्रभावीपणे राबविण्यात यावा - मुस्लिम समाजाची मागणी
निवेदन देताना सिकंदरभाई डांगे, मुस्ताकभाई मेटकरी, अभीदखान, पप्पूभाई शेख, जमशेद पठाण व इतर |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५ - अल्पसंख्यांक दिवस प्रभावीपणे राबविण्यात यावा या मागणीसह मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन फलटण शहर व तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने प्रांतधिकारी श्री. शिवाजीराव जगताप यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्री. सिकंदरभाई डांगे, तालुका अध्यक्ष श्री.आबिदभाई खान, शहर अध्यक्ष श्री. जमशेदभाई पठाण, शहर उपाध्यक्ष श्री .मतिनभाई बागवान , पै. पप्पूभाई शेख, रौफभाई पठाण , मुश्ताक भाई मेटकरी, आसलमभाई मोदी, हाजी सादीकभाई बागवान, श्री.आसीफभाई शेख, मुबिनभाई इनामदार, उपाध्यक्ष श्री. फिरोजभाई शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते
१८ डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक दिवस म्हणून साजरा करावा व विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करावे, तसेच शाळा विद्यालय येथे विविध प्रकारच्या स्पर्धा घेऊन व अल्पसंख्यांकांमध्ये जनजागृती निर्माण करावी. वक्फ व इनाम जमिनीचे मालकी हक्क सदरामधील तसेच या जमिनीची मालकी व वैयक्तिक नावे न ठेवता वक्फ संस्था व ट्रस्टच्या नावे करण्याच्या सूचना तहसीलदार यांना देण्यात याव्यात. केंद्र शासनाने पंतप्रधान १५ कलमी विकास कार्यक्रम जाहीर केला तो प्रभावीपणे राबवावा. केंद्र शासनाने पहिली ते आठवीच्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती बंद केली आहे ती पुन्हा सुरू करावी. मुस्लिम समाजातील विद्यार्थी व गरजूंना जातीचा दाखला काढत असताना अनेक अडचणी येतात त्याबाबतच्या जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात व सुलभपणे दाखला देण्यात यावा. मुस्लिम समाजातील शेख,पठाण सय्यद, खान, इनामदार, डांगे या आडनावाचा इतर मागासवर्गीय मध्ये समावेश करावा व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने २५/११/२०२२ च्या सर्व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निर्देशानुसार १८ डिसेंबर हा अल्पसंख्यांक दिवस प्रभावीपणे राबविण्यात यावा अशा मागणीचे निवेदन फलटणचे प्रांत अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्या विभागाचे वतीने निवेदन देण्यात आले.
No comments