गुणवरे येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; युवकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १४ डिसेंबर : गुणवरे ता. फलटण येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुणवरे येथील युवकावर विनयभंगासह बालकाचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियमाद्वारे फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत संबंधित पिडीतेने दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १३ डिसेंबर रोजी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास गुणवरे गावच्या हद्दीत गावडे वस्ती येथुन शाळेकडे जात असताना, शुभम तात्याबा आढाव वय २१ रा. गुणवरे ता. फलटण याने संबंधित मुलीस मला तुझ्याशी बोलायचे आहे म्हणुन पाठलाग केला व हाताने मारहाण केली. पुदीत मुलीचा हात धरून तीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पुढिल तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भोसले करीत आहेत.
No comments