Breaking News

नानासाहेब इवरे यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

Nanasaheb Iware's entry into Shiv Sena of Balasaheb in the presence of the Chief Minister

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  - भाजपा युवा मोर्चाचे फलटण तालुकाध्यक्ष व फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील युवा नेते नानासाहेब उर्फ पिंटू इवरे यांनी दि. ८ रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.  प्रवेशाप्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव मोरे,  सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.

    बाळासाहेबांची शिवसेना पक्षात नानासाहेब इवरे  व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रवेश केल्यानंतर, इवरे यांची फलटण तालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली असून तालुक्यात पक्ष वाढविण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.

No comments