पिंप्रद येथे कोयत्याने वार ; दोघांवर गुन्हा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १४ डिसेंबर : पिंप्रद येथे कोयत्याने वार करुन एकास जखमी केल्याची व अन्य एकास मारहाण करुन त्याच्या गळ्यातील तीन तोळ्याची चैन तोडून नेल्या प्रकरणी पिंप्रद ता. फलटण येथील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेले माहितीनुसार, धिरज रामदास कापसे वय २५ रा. पिंप्रद ता. फलटण यास १३ डिसेंबर २०२२ रोजी रात्री आठच्या सुमारास पिंप्रद येथील सावतामाळी मंदिरासमोर रोहित शिंदे व अन्य आनोळखी इसमाने दुचाकीवरुन येवून गाडी थांबविण्यास सांगितले. तुला मस्ती आली आहे काय, असे विचारत लोखंडी कोयत्याने धिरजच्या हातावर वार केला. यावेळी धिरजचा भाऊ सुरज हा भांडण सोडविण्यासाठी मधे पडला असता, अनोळखी इसमाने त्यास मारहाण केली व रोहित शिंदे याने त्याच्या गळ्यातील तिन तोळ्याची चैन तोडून घेतली. याबाबतची फिर्याद धिरज कापसे याने दिली असुन तपास सहाय्यक फौजदार डी डी कदम करीत आहेत.
Post Comment
No comments