Breaking News

फलटण पोलिसांकडून चोरीचे गुन्हयातील १४ मोटारसायकली जप्त

Phaltan police seized 14 motorcycles from the crime of theft

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ - फलटण शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने धडाकेबाज कामगिरी करत विविध चोरीच्या गुन्हयातील १४ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. तपास पथकाने गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही फुटेज, तसेच मोबाईल सी. डी. आर. याच्या माध्यमातून आरोपीस अटक करून त्याच्याकडून त्याचे इतर साथीदार व विविध गुन्ह्यातील १४ मोटरसायकली जप्त केल्या.

    दिनांक ०६/११/२०२२ रोजी १२.३० ते ०२.०० वाजण्याच्या दरम्यान मुक्ताई टेक्ससाईल दुकानासमोर गजानन चौक फलटण येथून कोणीतरी अज्ञात चोरटयाने हिरो होंडा स्पेल्डर मोटार सायकल क्रमांक एम.एच.११ सीएल ८८०७ ही चोरुन नेली असल्याचा गुन्हा अज्ञात इसमाच्या विरुध्द फलटण शहर पोलीस ठाणे गुरजि.नं. ५०६/२०२२ भा.द.वि.स. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयाचा तपास  पोलीस निरीक्षक फलटण शहर पोलीस ठाणे यांच्या आदेशाने पो. हवा विरकर  फलटण शहर पोलीस ठाणे यांचे कडे देण्यात आलेला होता.

    फलटण शहरामध्ये अलीकडच्या काळातील होणारे मोटार सायकलचोरीस प्रतीबंध करण्यासाठी तानाजी बरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग फलटण व पोलीस निरीक्षक पवार यांनी याकामी पोलीस ठाणे कडील डी.बी पथकाचे अधिकारी नितीन केनेकर सहा. पोलीस निरीक्षक तसेच तपास पथक यांची नेमणुक करुन, सदरचा गुन्हा उघडकीस आणने कामी मार्गदर्शनक केले हाते. वरीष्ठाचे मार्गदर्शनाखाली तपासपथक यांनी घटनास्थळाचे आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही फुटेज, तसेच मोबाईल सी. डी. आर यांचे तांत्रीक विश्लेश्वन करुन व गोपनिय बातमीचे आधारे तपासादरम्यान चिराग राजेश मदने वय २५ वर्षे रा. तरडफ ता. फलटण जि सातारा यांने सदरची मोटार सायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने, सदर आरोपी यांस ताब्यात घेवुन, तपास पथकाने अंत्यत कौशल्यपूर्ण व कसोसिने त्यांचे कडे तपास करुन गुन्हयातील मोटार सायकल जप्त केली तसेच पोलीस अभिरक्षेदरम्यान आरोपी यांचे कडे अधिक तपास केला असता, सदर अटक आरोपी व त्यांचे इतर दोन साथीदार सोमनाथ गौतम भोसले रा. ढवळ जा. फलटण व इतर यांचे मदतीने केले १४ मोटार सायकली चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले असुन, आरोपी यांचे कडुन एकुण १४ मोटार सायकली असा एकुण ३,३८,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन फलटण शहर पोलीस ठाणे, फलटण ग्रामिण, दहिवडी पोलीस ठाणे, पोठाणे लोणंद, बारामती यांचे कडुन एकुण ०६ गुन्हे उघडकीस आलेला असुन गुन्हयाचा अधिक तपास सुरु आहे.

    सदरची कारवाई ही समिर शेख पोलीस अधिक्षक सातारा,  बापू बांगर अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, तानाजी बरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भाग फलटण,  दादासाहेब पवार, पोलीस निरीक्षक फलटण शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली  नितीन केनेकर सहा. पोलीस निरीक्षक,  नितीन शिंदे सहा. पोलीस निरीक्षक,  शिंदे पोलीस उपनिरीक्षक, दिपाली गायकवाड पोलीस उपनिरीक्षक, स.पो फौजदार कदम, पो. हवा काळुखे, पो.ना. जगताप, पोना लावंड , पो.ना. तांबे, पो.ना.मुळीक , पोना दडस, पो.ना. कर्पे, पोकॉ मेगावडे, पो कॉ सांडगे, पो कॉ घोरपडे, पो कॉ कर्णे , पो कॉ नाळे यांनी सदर कारवाई मध्ये भाग घेतला आहे. 

No comments