Breaking News

राज्यस्तरीय बीज प्रक्रिया स्पर्धेत सासकलचे प्रदीप मुळीक दुसरे तर जान्हवी मुळीक ला विशेष प्रथम पुरस्कार

Pradeep Mulik of Saskal got second prize while Janhvi Mulik got special first prize in the state level seed processing competition

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - राज्यस्तरीय बीजप्रक्रिया स्पर्धा खरीप हंगाम सन २०२२ मध्ये सासकल गावचे सुपुत्र व प्रगतिशील शेतकरी प्रदीप शिवाजी मुळीक हे संपूर्ण राज्यातून दुसऱ्या क्रमांकाचे विजेते ठरले असून सासकल ता.फलटण गावची जानवी संतोष मुळीक हिला विशेष प्रथम पुरस्काराने दोघांनाही पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे. 

   या यशाबद्दल सासकल गावच्या सरपंच उषा राजेंद्र फुले व ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, शिवशंकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक,कृषि विभाग व सासकल गावच्या ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

No comments