Breaking News

प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेट स्कूल व ज्यु. कॉलेज गुणवरे येथे पालक स्नेह मेळावा संपन्न

Progressive Convent School and Junior College, Gunavare, held a Parent Sneh Melava

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -  सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेट स्कूल व ज्युनियर कॉलेज गुणवरे,  येथे दिनांक २४ डिसेंबर २०२२ रोजी पालक स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ.सौ.अपर्णा पवार (सायकॉलॉजिस्ट बारामती), श्री. दारासिंग निकाळजे सर (केंद्र प्रमुख निंबळक), श्री.विशाल पवार सर (सचिव,सरस्वती शिक्षण संस्था), सौ.संध्या गायकवाड (व्यवस्थापकीय संचालिका, सरस्वती शिक्षण संस्था), सौ.प्रियांका पवार (संचालिका, सरस्वती शिक्षण संस्था तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका), प्रशालेचे पर्यवेक्षक श्री.किरण भोसले, समन्वयिका सौ. सुप्रिया सपकाळ व  नर्सरी ते इयत्ता सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. 

  पालक आणि शाळा यांच्यातील सुसंवाद वाढविण्यासाठी तसेच पालकांच्याही कला गुणांना वाव मिळावा हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे  प्रियांका पवार मॅडम यांनी प्रास्ताविका मध्ये  स्पष्ट केले. 

    या नंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ.सौ .अपर्णा पवार मॅडम (सायकॉलॉजिस्ट बारामती) यांनी पालकांसाठी मार्गदर्शन केले.   त्यानंतर इयत्ता 5 वी मधील आदित्य कदम, 6 वी मधील श्रेया शेलार आणि 7 वी मधील श्रावणी चव्हाण या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आईवडिलांविषयी असणाऱ्या भावना भाषणातून व्यक्त केल्या.  या पालक मेळाव्या दरम्यान अनेक पालकांनी आपल्या शाळेमधील चांगल्या गोष्टीची माहिती दिली व त्यांना अपेक्षित असलेल्या बाबींवर देखील आपली मते व्यक्त केली.

    पालक स्नेहमेळाव्यात महिलांसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेण्यात आला आणि होम मिनिस्टर या कार्यक्रमा मध्ये अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये अंतिम स्पर्धक ज्याला जास्त गुण मिळाले असा स्पर्धक विजयी म्हणून घोषित करण्यात आला.  या स्पर्धांमध्ये  जास्त गुण मिळवून पालक सौ.शितल सस्ते या विजयी झाल्या. त्यांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी देण्यात आली.

   पुरुष पालकांसाठी मनोरंजन खेळाचे आयोजन करण्यात आले होते. संगीत खुर्ची आणि फुगे फुगवण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमधील विजेत्या पालकास वेगवेगळी बक्षीस  मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. तसेच मनोरंजनासाठी 'चालता - बोलता' असा एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि जो पालक तीन प्रश्नांची अचूक उत्तरे देईल त्यास मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका निकिता मुळीक यांनी केले तर आभार प्रियंका नाझिरकर यांनी मानले. तर कार्यक्रम परिपूर्ण होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी खूप परिश्रम घेतले.  

No comments