Breaking News

चंद्रकांत पाटलांचा फलटण मध्ये निषेध ; मोर्चा निघणार

Protest of Chandrakant Patal in Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ - निधींसाठी सरकारवर अवलंबून का राहता? या देशात शाळा कुणी सुरू केल्या. महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. या सर्व शाळा सुरू करताना शासनाने त्यांना अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली, असे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथे एका कार्यक्रमात केले. त्यामुळे सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.  

    चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यसह फलटणमध्येही उमटले असून, दि. ९ डिसेंबर रोजी संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून चंद्रकांत पाटील यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान संविधान समर्थन मोर्चाच्या वतीने चंद्रकांत पाटलांचा निषेध व्यक्त करत, केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ दि. 10 डिसेंबर रोजी फलटण येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 

No comments