Breaking News

जिल्हास्तरीय सी. के. नायडू स्पर्धेसाठी श्रीमंत शिवाजीराजे (सिबीएससी), मुधोजी हायस्कूल व मालोजीराजे शेती विद्यालय पात्र

१७ वर्षा खालील विजेत्या संघाचे अभिनंदन करतान मुधोजी हायस्कूल चे प्राचार्य बाबासाहेब गंगवणे , उपप्राचार्य एस फडतरे , पर्यवेक्षक शिवाजीराव काळे , क्रीडा मागदर्शक अमोल नाळे व धनश्री क्षिरसागर
Shrimant Shivajiraje (CBSC), Mudhoji High School and Malojiraje Farming School qualified for District Level CK Naidu Competition

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  : २१ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर रोजी मुधोजी महाविद्यालय फलटण येथे पारपडलेल्या १४ , १७ व १९ वर्षा खालील सी के नायडू शालेय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मुधोजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य पी. एच . कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व उपस्थित १४ , १७ व १९ वर्षाखालील संघाच्या विद्यार्थांना मागदर्शन करून संपन्न झाले. १४ वर्षाखालील स्पर्धेत श्रीमंत शिवाजीराजे (सिबीएससी) तर १७ वर्षाखालील स्पर्धेत मुधोजी हायस्कूल आणि १९ वर्षांखालील स्पर्धेत मालोजीराजे विद्यालय विजयी ठरले.

    स्पर्धेचा शुभारंभ प्रसंगी फलटण तालूका क्रीडा समन्वयक गणेश गायकवाड , मुधोजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य वेदपाठक , फलटण क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे , क्रीडा शिक्षक  स्वप्नील पाटील ,  धनश्री क्षिरसागर , अमोल नाळे , अमित काळे ,  तायप्पा शेंडगे , राहूल पोतेकर , सुहास कदम , कुमार पवार , सोमनाथ चौधरी , टिल्लू चौधरी , अविनाश अहिवळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

      प्रथम १४ वर्षा खालील गटाचा अंतीम सामना श्रीमंत शिवाजीराजे इग्लिश मीडियम स्कूल (सिबीएससी)  ज्युनिअर कॉलेज जाधववाडी व श्रीमंत शिवाजीराजे इग्लिश मीडियम स्कूल ( एसएससी )  ज्युनिअर कॉलेज जाधववाडी फलटण यांच्यात झाला. यामधे  श्रीमंत शिवाजीराजे इग्लिश मीडियम स्कूल (सिबीएससी)  ज्युनिअर कॉलेज जाधववाडी यांनी श्रीमंत शिवाजीराजे इग्लिश मीडियम स्कूल ( एसएससी )  ज्युनिअर कॉलेज जाधववाडी फलटण यांच  ७ गडी राखून पराभव केला .

      १७ वर्षाखालील स्पर्धेचा अंतिम सामना मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण व श्रीमंत शिवाजीराजे इग्लिश मीडियम स्कूल  (सिबीएससी)  व ज्युनिअर कॉलेज जाधववाडी यांच्यात झाला यामधे  मुधोजीने   श्रीमंत शिवाजीराजे इग्लिश मीडियम स्कूल  (सिबीएससी)  चा ३० धावांनी पराभव केला.

     १९ वर्षा खालील स्पर्धेत मालोजीराजे शेती विद्यालय यांनी   श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल ( एसएससी ) व ज्युनिअर कॉलेज जाधववाडी यांचा ३५ धावांनी पराभव केला .

     तिन्ही विजयी संघ जिल्हास्तरीय सी के नायडू स्पर्धेसाठी पात्र ठरले असून ते सातारा येथील छत्रपती शाहू क्रीडा संकूल सातार येथे होणाऱ्या सी के नायडू स्पर्धेसाठी जिल्ह्यातील इतर संघांशी स्पर्धेत सहभागी होतील .

No comments