Breaking News

भरदिवसा लूटमार ; पोलीस अधिकारी असल्याच्या बहाण्याने घेतली झडती ; १५ तोळे सोने लंपास

Stealing gold jewelery by pretending to be a police officer

    फलटण (दैनिक गंधवार्ता) दि.११ -   सोन्याचे दागिने बँक लॉकरमध्ये  ठेवण्यास चाललेल्या वृद्धास, मोटारसायकल आडवी मारून, त्याला थांबवून, आपण पोलीस आधिकारी असल्याची बतावणी  करत वृद्धाची फसवणूक करून वृद्धाकडे असणारी सोन्याच्या दागिन्यांची पिशवी दोन अनोळखी इसमांनी  पळवून नेली. पिशवीत ४ लाख ५० हजार रुपये किंमतीचे सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने होते. 

    याबाबत सविस्तर माहिती अशी, चंद्रकांत पांडुरंग काळे वय ७७ वर्षे  रा. संजीवराजेनगर फलटण ता. फलटण हे पत्नीसह गुजरात राज्यात फिरण्यासाठी जाणार असल्याने, दि. ७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास घरातील सर्व दागिने घेवुन बुलडाणा अर्बन बँकेत लॉकरमध्ये ठेवणेसाठी अॅक्टीवा दुचाकी नं. एम एच ११ ए.सी.३६५५ वरुन निघाले. डॉ. जोशी यांच्या हॉस्पीटलच्या जवळ  लक्ष्मीनगर येथे दुपारी १२.४० ते १.०० वाजण्याच्या दरम्यान जात असताना, पाठीमागून एक इसमाने मोटारसायकलवरुन येवून, त्यांच्या पुढे गाडी आडवी मारुन, त्यांना थांबवले व मी पोलीस आधिकारी आहे, केव्हापासुन हाक मारतोय, शिट्टी वाजवतोय  थांबता येत नाही का? रात्रीपासुन पैसे आणि दागिने चोरीचे दोन तीन गुन्हे झाले आहेत ते मी पकडलेत तूला थांबायला काय झाले, असे म्हणाला व काळे यांना सांगितले की,  मी पुण्याचा क्राईम ब्रँचचा मोठा आधिकारी आहे. काळे यांना त्याने आयकार्ड दाखविले त्यामुळे काळे यांचा त्याचेवर विश्वास बसला. काळे यांच्या गाडीसमोरच थोड्या अंतरावर ऊभ्या असलेल्या दुसऱ्या एका इसमाची काळे यांच्या सारखीच,  अंगझडती घेतली व तो इसम तेथेच ऊभा होता, पोलीस अधिकारी आहे असे म्हणाणाऱ्या इसमाने काळे यांच्या दुचाकीची चावी घेवुन डीकीचे लॉक काढले व डीकी उघडली डीकीत ठेवलेली पिशवीत काय आहे असे म्हणुन,  काळे यांना पिशवी उघडायला लावली, पिशवीतील सोन्याचे दागिने त्या इसमाने पाहीले, तसेच काळे यांच्या गळ्यात असलेली सोन्याची चैन व बोटात असलेल्या दोन अंगठया पिशवीमध्ये ठेवायला सांगितल्या व पिशवीची गाठ बांधायला सांगितली.  तेवढ्यात त्या दुसऱ्या इसमाने मोटारसायकलच्या शिटवरील पिशवी घेवुन, पोलीस अधिकारी आहे असे म्हणाऱ्याच्या मोटारसायकलवर बसुन निघुन जात असताना, काळे यांनी  त्या इसमाला थांबवण्याचा प्रयत्न केला, तसेच गाडीच्या पाठीमागील कॅरेजला पकडले. काळे तसेच १०-१५ फुट फरफटत गेले, परंतु ते इसम सोन्याच्या दागिन्यांची पिशवी घेऊन निघुन गेले.  

     पोलीस अधिकारी आहे असा म्हणणारा त्याची ऊंची ६ फुट, रंग-निमगोरा, बांधा मजबुत वय अंदाजे ३५ वर्षे, अंगात फिकट निळ्या रंगाचा शर्ट साधी पॅन्ट गर्द निळ्या रंगाची पायात काळे रंगाचे बुट तसेच तेथे ऊभा असलेला दुसरा इसम अंदाजे ५ फुट रंग-निमगोरा, बांधा मध्यम, वय ३० वर्षे अंदाजे अंगात फुल बाहयाचा चेक्सचा शर्ट फिक्कट राखाडी रंगाची पॅन्ट, पायात चप्पल अशा वर्णनाचे आहेत. तर दागिन्यांच्या पिशवीत कोल्हापुरी साज, एक चैन, दोन अंगठ्‌या, चार बांगड्या, दोन पाटल्या दोन गंठण, एक मोठा व एक छोटा गंठण, राणी हार असे अंदाजे १५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने होते.  

No comments