Breaking News

फलटण शहरात चोरी वाढली ; गस्त व सिसिटीव्ही सुरू करण्याची काँग्रेसची मागणी

Theft increased in Phaltan city; Congress demands to start patrolling and CCTV

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ - फलटण शहरात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, या चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा व शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात यावेत अशी मागणी फलटण शहर  राष्ट्रीय काँग्रेस कडून करण्यात आली आहे.

    फलटण शहर व परिसरात सध्या चोरीचे व लुटमारीचे प्रकार   मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे, नागरिक भयभीत झाले असून, या संदर्भात चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा व यासाठी नागरिक व पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे शहरात गस्त सुरू करावी,  तसेच लोकसहभागतून शहरात  सीसीटीव्ही बसविन्यात आले आहेत, ते बंद असून, तातडीने चालू करण्यात यावेत असे निवेदन फलटण शहर राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने  फलटण शहर पोलीस स्टेशनचे सहा.निरीक्षक कदम यांना देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय काँग्रेसचे फलटण शहर अध्यक्ष पंकज पवार, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रितम जगदाळे,अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष अल्ताफ पठाण, ओबीसी आघाडीचे शहर अध्यक्ष विकास ननवरे,शहर कार्यकारीणी सदस्य श्री. मनोहर गायकवाड व इतर सदस्य उपस्थित होते.

No comments