जिद्द, चिकाटी व अविरत संघर्षाच्या जोरावर शिक्षण क्षेत्रात भरारी घेणारे नेतृत्व : विशाल पांडुरंग पवार
काही माणसं जन्मत:च वलयांकित, प्रतिभावान असतात. आपल्या सहकार्य प्रवृत्ती व संघटन कौशल्य यांच्या पाठबळावर, माणुसकीच्या जोरावर व आपल्या स्वतः ची जिद्द, चिकाटी व अविरत संघर्षाच्या जोरावर, प्रतिकूल परिस्थिती वर मात करून अगदी कमी वेळेत शिक्षण क्षेत्रात भरारी घेणारे, विचारशील, संयमी व अभ्यासू असणारे, सतत धडपड व संघर्ष हे जणू त्यांचे समीकरणच तरीही त्यातून वाट काढत फलटण तालुक्यात शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या उत्साही व मनमिळावू स्वभावाने सर्वाना जवळ करणारे कार्यकुशल व प्रेरणादायी नेतृत्व म्हणजे सरस्वती शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव श्री. विशाल पांडुरंग पवार याचा आज दि. 8 डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा होत आहे त्या निमित्ताने त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वचा थोडक्यात घेतलेला आढावा......
श्री. विशाल पवार सर लहानपणापासूनच अतिशय हुशार, चाणक्ष व परिस्थितीची जाण असलेले व्यक्तिमत्व पुढे जाऊन आपलं बिंब स्वकर्तृत्वावर विस्तारण्यात यशस्वी झालेले पाहायला मिळते. आजच्या काळातील शिक्षणाचे महत्व ओळखून गरीब मुलां- मुलींना सहज शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून देशासाठी चांगली पिढी घडविण्यासाठी स्वतःच्या इच्छा शक्तीच्या जोरावर 2008 मध्ये कोळकी ( फलटण ) येथे प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची स्थापना केली तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे म्हणून जून 2015 साली गुणवरे येथे प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची स्थापना केली.
सर्व सामान्य कुटूंबात जन्माला येऊन कोणत्याही परिस्थितीत न डगमगता संयम, चिकाटी व धैय यांच्या जोरावर येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात केली. नावाप्रमांणेच त्याचे मनही विशाल आहे. त्यांच्या या स्वभावामुळे अनेक शैक्षणिक, राजकीय, सामाजिक व धार्मिक लोकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध निर्माण झाले व त्यांनी ते जपले. अगदी प्रत्येकाच्या सुख दुःखात आपुलकीने सहभागी होणारे, प्रत्येकाची अडचण ओळखून न मागता मदतीला धावून जाणारे कुणालाही आधार वाटावा असे व्यक्तिमत्व. कोणत्याही जाती - धर्म, गरीब - श्रीमंत असा भेदभाव ही त्यांच्या कधी मनात न येता माणुसकी जपणे हेच त्यांचे तत्व.
कोणताही शैक्षणिक वारसा नसतानाही अगदी समर्थपणे ते दोन्ही संकुल व्यवस्थितरित्या चालवत आहे. आज दोन्ही शाळा कला, क्रीडा, शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहेत. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून विविध उपक्रम राबविले जातात. तसेच विद्यार्थी व पालक यांच्यासाठी समाजातील तज्ञ व्यक्तीचे बहुमोल मार्गदर्शन दिले जाते. त्यांच्या या मनमिळाऊ स्वभावामुळे पालकांशी त्यांचे मैत्रीचे संबंध निर्माण झाले. तसेच कोरोना काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरु असताना त्यांना वैयक्तिक लक्ष दिले. काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणी त्यांनी वैयक्तिक पातळीवर सोडविल्या. तसेच ऑनलाईन शिक्षण सुरु असताना देखील विविध उपक्रम ऑनलाईन पद्धतीने घेतले. शिक्षण क्षेत्रात कार्य करत असताना विद्यार्थी हा सुसंस्कृत व जबाबदार नागरिक घडला पाहिजे हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवले.
सामाजिक क्षेत्रातही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप, वृद्ध व अनाथ आश्रमांना मदत, रक्तदान शिबीर तसेच कोरोना काळात गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूचे वाटप असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले.
No comments