Breaking News

मिरढे येथे महिलेचा विनयभंग

Woman molested in Mirde

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ - मिरढे ता. फलटण येथे महिलेच्या डोक्यावरून हात फिरवून, तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून, पीडित महिलेच्या सासू - सासऱ्यास मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केल्या प्रकरणी मिरढे ता. फलटण येथील एकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

    याबाबत सविस्तर माहिती अशी, पीडित महिला मिरढे ता. फलटण येथे तिच्या घरात झोपलेली असताना, दि. २२/१२/२०२२ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास शुभम संजय काकडे रा. मिरढे ता. फलटण याने, घरात येऊन पीडित महिलेच्या डोक्यावरून हात फिरवून उठवले व पीडित महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.  तसेच पीडित महिलेच्या सासू - सासऱ्यास  हाताने मारहाण करून,  शिवीगाळ व दमदाटी केली असल्याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार कर्णे हे करीत आहेत.

No comments