पिंप्रद येथे महिलेचा विनयभंग ; युवकावर गुन्हा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ डिसेंबर - मौजे पिंप्रद ता. फलटण येथे, पीडित महिलेच्या घराच्या अंगणात जाऊन, पीडित महिलेचा हात धरून, तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशी कृती व वक्तव्य करून, तिला शिवी गाळ - दमदाटी केल्या प्रकरणी पणदारे ता.बारामती येथील युवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास, सुमित पोपट बनकर रा.पणदारे ता.बारामती जि. पुणे याने मौजे पिंप्रद ता. फलटण येथे, पीडित महिलेच्या घराच्या अंगणात जाऊन, पीडित महिला अंगणात बसलेले असताना, तू माझे सोबत लग्न कर असे म्हणून पीडितेच्या हाताला धरून जवळ ओढून,तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. बनकर यास पीडिता, मी तुझ्याशी लग्न करणार नाही असे म्हणाली असता, त्याने पीडितेस, शिवीगाळ केली तसेच कशी लग्न नाही करत ते मी बघतोच असे म्हणून धमकी दिली, तसेच पीडितेच्या आई-वडिलांना शिवीगाळ केली असल्याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार कदम करीत आहेत.
No comments