Breaking News

सरडे येथे महिलेचा विनयभंग

Woman molested in Sarade

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१८ - मौजे सरडे ता. फलटण येथे आम्हाला फसवणुकीची नोटीस का पाठवली असे म्हणून, पीडित महिलेचा हात धरून, पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी वडझिरे ता. पारनेर जि. अहमदनगर येथील, दोघांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    याबाबतीत अधिक माहिती अशी,  दि. २७/११/२०२२ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास, रामा जबाजी दिघे व बाबू उर्फ सार्थक रामा दिघे दोन्ही रा. वडझिरे कुरण बांध ता. पारनेर जि. अहमदनगर यांनी, मौजे सरडे ता. फलटण येथे पीडित महिलेच्या घरी जाऊन,

    आम्हाला फसवणुकीची नोटीस का पाठवली, असे म्हणून पीडितेचा हात धरून, तिला कॉटवरून ओढून, तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले व पीडितेला शिवीगाळ करून धमकी दिली असल्याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार सूर्यवंशी करीत आहेत.

No comments