Breaking News

उपळवे येथे महिलेचा विनयभंग करून कुऱ्हाडीने मारहाण ; दोन महिला जखमी

A woman was molested and beaten with an ax at Upalve; Two women injured

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ - मौजे उपळवे ता. फलटण गावचे हद्दीत गाढवाचा मळा येथे पीडित महिलेचा हात धरून, पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्याबाबत गावातील लोकांना सांगितले याचा राग मनात धरून,  पीडित महिलेस व तिच्या वहिनी यांना कुऱ्हाडीने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी उपळवे येथील, तिघांच्या विरोधात विनयभंग व मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे उपळवे ता. फलटण गावचे हद्दीत गाढवाचा मळा येथे दि.१५ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास  पीडित महिलेस, विजय भाऊराव जगताप रा. उपळवे याने, तू मला खूप आवडतेस, माझ्या सोबत चल असे म्हणून, पीडितेचा हात धरून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्याबाबत गावातील लोकांना सांगितले याचा राग मनात धरून सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास जगतापवस्ती, उपळवे येथे टिट्या हनुमंतराव जगताप व  हनुमंतराव जगताप दोन्ही रा. उपळवे ता. फलटण यांनी हाताने व दगडाने व कुऱ्हाडीने मारहाण करून पीडित महिलेस व तिची वहिनी यांना जखमी केले असल्याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.

No comments