पणदरे येथील युवकाकडून पिंप्रद येथील युवतीचा दुसऱ्यांदा विनयभंग
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार ५ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास संबधीत युवती ही पिंप्रद ता. फलटण येथे आपल्या घराबाहेरील पोर्चमध्ये पेपर वाचत बसली होती. त्यावेळी बनकर तेथे आला व तु माझ्या विरुध्द पोलिस ठाण्यात तक्रार का दिलीस असा जाब विचारत त्या युवतीचा हात पिरगाळून, मी तुझ्याशीच लग्न करणार आहे असे म्हणत, तीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच तिच्या आई वडिलांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. पुढिल तपास सहाय्यक फौजदार डी. डी. कदम करीत आहेत.
दरम्यान उपरोक्त घटनेतील सुमित बनकर याने दि. 30 नोव्हेंबर रोजी देखील पीडितेचा विनयभंग केला होता. त्यानुसार दि. 1 डिसेंबर रोजी बनकर वुरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.
No comments