८२३ वर्षांची परंपरा ; कुंभार टेक फलटण येथे मकर संक्रांतीनिमित्त ओवसा कार्यक्रम संपन्न
द्वारे गोसावी निर नदीसी सुर्यग्रहना लागी बिजे करीती आता उत्तरेचेया नगर महाद्वारा आने आश्रीत कुंभारटेक : तेथ गोसावीयाचीया मावुसीया ओवसा केला कुंभारा करवि आवा करविला : कुंभारे केला : तव तेथ शाळेसी गौड देशीचा ब्राम्हण राहीला होता : तो आवा मंत्रे करूनी मंत्री : आन सकळ भांडे फुटेती : ऐसे तीन आवे फुटले : मग गोसावी याचीया मानुसीया गोसावीयात विनविले : मग तया सहीत आवया जवळी बीजे केले: आवयासी श्रीचरण लाविला : इतुकेनीआवा निका जाला : गौडासी आन नगर लोकासी आश्चर्य जाले : मग गोसावी आपलेया घरा बिजे कले : मग मावुसीया ओवसा केला :॥: आता कुंभार टेकाहुनी पर्वे आग्ने आश्रीत पुर्वेचे नगर महाद्वार : हनुमंता पश्चीमे असे : तेथ गोसावी सह्याद्री बिजे करीता राणी राहाविले परते न राहे : मग महाद्वारा इशान्ये पव्हे : पुर्वामुख तेथ रीगता डावेया हाता बाळानेया वरी आसन जाले : विडा जाला : राणीये तांबुळ दान दिधले : आनस्थीती जाली : भोगीली भंगीली : मग राणीयेत संबाखुनी पव्हेया संघाते सैह्याद्रासी बीजे केले : सवे गावीचे महाजन बाेळवित निगाले : ते सीवेसी राहावीले : मग गोसावी बिजे केले : पव्हे पुर्वे दोनी तळोलीया तेथे विहरन : महाद्वारा नैरूत्ये खोलाळेया पुर्वे तळोली : तीचा पश्चीमीली भागी लिंगाचे देवळ : तेथ विहरन तथा पश्चीम गावांत नारायणाचा मढ उत्तरामुख : तेथ गोसावी कदाचीत पुराण आइकेती : तो मढ वैश्म्हयाने बांधला : म्हणोन तयाते वैश्येचे देवुळे म्हणती : आता नारायण मढ़ा इशान्ये आवडा एकाचेनी माने :
No comments